वसई तालुका कला-क्रिडा महोत्सवाच्या २५ वर्षा


वसई तालुका कला-क्रिडा महोत्सवाच्या २५
व्या वर्षानिमित्त यंदा १५ नोव्हेंबरपासून सुरू
होणारा 'माही महोत्सव'
वसईच्या पुरातन संस्कृतीचे दर्शन
घडवणार आहे.नरविर
चिमाजी आप्पा मैदानावर
भरणाऱ्या या महोत्सवाची तयारी अंतीम
टप्प्यात आहे.
वसईचा किल्ला,जुने वाडे,बैलाने ओढले जाणारे
खाट,पुरातन वस्तू महोत्सवाचे आकर्षण ठरणार
आहेत.या निमित्त मैदानाच्या ७ एकर जागेवर
ग्रामीण
जीवन,संस्कृती उलगडणारे
खेडे आकाराला येत आहे.
वसई तालूका कला- क्रिडा महोत्सवाच्या २५
व्या वर्षानिमित्त आमदार हितेंद्र ठाकूर
यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश सावे
यांच्या संकल्पनेतून १५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान '
माही महोत्सव ' आहे.
वसईतील विविध समाजाचे
रहाणीमान,पारंपरिक
व्यवसाय ,चालीरीती,सण-
उत्सव,हत्यारे,अवज
ारे,भांडीकुंडी,खाद्य
संस्कृती यांचे प्रदर्शन वसई
आणी अर्नाळा किल्ल्याची तटबंदी ,वास्तुरचना आणी प्रतिकृती ,जुने
वाडे ,बैलाने फिरवला जाणारा रहाट
वसईच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या दैनंदिन
जीवनशैलीवर प्रकाश
टाकणारी आणि स्मुती ताजी करणारी मनमोहक
द्रुष्ये ,दैनंदिन वापराच्या वस्तू,कारागिरां
ची प्रात्यक्षिके
आणि त्यांनी उत्पादित
केलेल्या वस्तू,महिला बचत गट,
नर्सरी, लघुउद्योजक
यांनी तयार
केलेली उत्पादने , कृषिमाल ,पारंपरिक
खाद्य संस्कृतीचा महोत्सवात समावेश
असणार आहे.
'
माही महोत्सवा 'ची तयारी अंतिम
टप्प्यात
आली असून ,त्यासाठी शेकडो हात
काम करीत आहेत.हा महोत्सव
म्हणजे ठाणे,पालघर ,
मुंबईकरांसाठी वसईच्या पुरातन
संस्कृतीची ओळख करून
देणारा महत्वाचा दुवा आहे.या महोत्सवाचे
प्रवर्तक सावे , हेमंत म्हात्रे , प्रकाश
वनमाळी यांच्यासह अनेक जण आठ
महिने यासाठी झटत आहेत.
वसईचा किल्ला वेधणार लक्ष...
वसईचा किल्ला महोत्सवामध्ये आकर्षण ठरणार
आहे.महोत्सवात अठराव्या शतकातील
वसईच्या किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात
आली आहे.पुणे येथिल न.चि.केळकर
म्युझियममध्ये असलेल्या शनिवार
वाड्याच्या प्रतिकृतीपेक्षा
वसईच्या किल्ल्याची प्रतिकृती मोठी आहे.पोर्तृगिजां
च्या वेळी किल्ल्यामध्ये
असलेली न्यायालय , नगरपालिका ,
प्रशासकीय इमारत , साखर कारखाना ,
जहाज दुरूस्ती कारखाना ,बाजारपेठ ,
पोर्तृगिजांची वखार ,
सैनिकांची निवासस्थाने दाखवण्यात
आली आहेत.१२× १८ या साईजमध्ये
ही प्रतिकृती तयार
करण्यात आली असून , किल्ल्याला नऊ
दरवाजे ,विविध आकाराचे १०
बुरूज ,भुयारी मार्ग ,किल्ल्यातील
सात चर्च ,चार मंदिरे , बालेकिल्ला दाखवण्यात
आला आहे.इतिहास अभ्यासक
श्रीदत्त राऊत
यांच्या मार्गदर्शनाखाली आतिष
पाटील , जयदीप
चौधरी आणि मुकुंद
चौधरी दीड महिन्यापासून
याचे काम करीत आहेत.
नृत्यातून समाज संस्कृतीचे दर्शन...
' माही वसई ' महोत्सवात
आदिवासी ,
आगरी ,वाडवळ ,भंडारी ,कोळी ,पानमाळी ,
ख्रिस्ती ,सामवेदी या समाजाच्या सण-
उत्सवांमध्ये सादर होणारी नृत्ये
आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम रोज सादर केले
जाणार आहेत.....


More Articles