फीटचे फीट दोन वेन्यो घालोन याशी,
आन मेनवातीये नक्षी काडलेल्यो तांबड्यो रेबिनी घाल्याशी.
वर्गात खिरताना तीन माई कते - कते नजरानजर ओह्याशी,
आन मंग मा पोटात फाळ याशिस बाकी ऱ्याशी.
मास्तरने इला शिक्षा केली गा मा जीवाई आकळ ओह्याशी,
आन माला वर्गातने बायार काडला गा ई पापनी ओली ओह्याशी.
हिकवनीला जाताना लाँग-कट घेओन इ मा दापुडने जाशी,
आन इ मांगो-माग मंग माई सायकल निंग्याशी.
मा मावशी घरा मेरे याई कागड्याई पट्टी होती,
आठवड्याला दोनदा मावशी घारा माई फेरी पक्की होती.
जाता येता खूब वेळा बेठले पन बोल्याशी हिम्मत कय जाली नाय,
दाव्वी स्येडोप आलो ताव गाडी कय पुडे सरकाली नाय.
दाव्विला माओ टांगो जालो पलटी आन घोडे जाले फरार,
आन कॉलेज कऱ्या इने निवडला सेंट झेवियरसा आवार.
पडात उठात दाव्वी मे पन जालो,
मामा ओळखीन आयटीया करोन कामा-ला लागलो.
मनातने ती नव्वित बगीलेली मूर्ती कय जात नोती,
तरी मावशी घारा फेरी माऱ्याशी हिम्मत मात्री होथ नोती.
खूब वहरानंतर देवळा शिटी वासली तीगाळा नाव तीआ आयकीला,
दऱ्योर जाऑन जाम रडलो तीगाळा कडे बरा वाटला.
लगीन ऑहॉन ती मास प्यारीश मीने आलती,
पन उंबरा फुलागथीन नंद्र्या कय पडात नोती.
मंग कतेतरी मा माळोरश्या खोलीला दरबाजो लागलो,
मावशीने आढलेल्या निरोपोर मे वराडलो.
मा पोरीआ बाळटीमाला देवळा पायऱ्योर ई बेठली,
मा पोटात परत एकदा फाळ याशीस बाकी रेली.
जरा पुडे जाऑन फिरली आन 'माला आख मारलीआ?' आहा कयतरी बोयली,
'नाय' अही मे नुस्तीस आथाये खून केली.
आली तहीस ती परत गेली,
पटापट पायऱ्यो उतरोन रस्त्या लागली.
दोन वेन्यायी आते एक वेनी जालती,
सलताना अडने-तडने हालोन माला जहनी टीलवितोती.
Source Sunil D'mello | 2786 views
Posted on 06 Dec 2012