हाकोटश्या हॅवश्या, वा-या हरी, पावने स शी आयमेरी, कानाला बरी -Rajan D'mello

“हाकोटश्या हॅवश्या, वा-या हरी,
पावने स शी आयमेरी, कानाला बरी”
साडे स श्या मिसाला, उठली मरी,
अन्द्र्यानॅ मारलॉ तीला, टॉमनॉ भारी ॥

हाकोटश्या पारा, हॅवसा वारा,
उठी उठी गोपाळा, कानाला बरा ॥
आड्डाली बय (मरी), आज हाय तुमशी शाळा,
नी हिकयाला टांगविल्याला, धान आतॅ गीळा ॥

शाळीऑ आंगाला, आमश्या घनॉस कापरॉ,
हेड-मास्तरसॉ नंदाखालश्या, बो घाबरॉ ॥

इनूस-पीटर (Inspector) यासॉ बघून, शाळीला मारली दांडी,
टॅपा खालश्या हेतोर जाऑन, बुझीली वालाई बांडी॥

थरॅ नाय नंदार, आमशी, गाणीत भूमितीवर,
अठवी नाय ती आमश्योंरनॅ, आलु-मास्तर ॥

इंग्लिश मींजॅ आमसा, नुसता कसरा,
वाशिता – वाशिता आला, तॉन्डाला फॅफरा ॥

‘संधि सोडवा’, शेवट पर्यन्त नाय हादला,
व्याकरनाआ अन आमसा, कत्तॅस नाय जमला ॥

त्रिकोण – चौकोन – पाढॅ आमाला, आठवालेस नाय पटकान,
गणिताऑ पेपर आमसॉ, बघुनुस खपलॉ झटकान ॥

आलेखायो वहयों सब्बन, घारा बाहाले,
मास्तरनॅ त्या पट्टिऍ, जकले हा..र्र..के होकयले ॥

आमसा रागावना, आन मास्तरसा पिसाळना,
मास्तरनॅ सुरू कॅला, कविता हिकविना ॥

आमसा विडंम्बन मास्तरश्या कवितेला,
ब-यापैकी आहास, मग जुगॉन गॅला ॥

“शिंगे रंगविले, बाशिंगे बांदीले, चढविल्या झूली,
“तुस्कान - मास्तर, तुस्कान – मास्तर” (१७ वॅळा)

विशेष टिप :-
“तुस्कान मास्तर- तुस्कान मास्तर” या विडंबित शब्दाऑ मूळ शब्द : “तुस्त-मस्त, तुस्त-मस्त” ---- (फक्त १ वॅळा)

राजन डिमेलों
मोबाईल - ८९८३४०९९८५
ई-मेल – dmellorv@bharatpetroleum.in


More Poems