वर्ष १९७५ , एक प्रसंग मा बालपनासो !! -Nelson D'Mello

वर्ष १९७५ , एक प्रसंग मा बालपनासो !! - माई भोटी बय माला सदा हान्ग्याशी '' पोरा , धान जीव , धाना पुडे बिया कय नाय '' पान लानपणी माला धान डेवेसा नाय , माला लटर फटर खाशी जाम होस , जडे तडे जाम सापारे घ्यासो , कून माला कागुळो हान्ग्यासे ते कून उन्दूर हान्ग्यासे . तीगाळा खादो होतास का ? पान जा हाता लागला ता गोड लागला , तीगाळा परीस्तीती तहीस होती , तीगाल्शा लोकाई ताते विकिले आन बटर घेटले ,कादो ते ओबडे तोंडे खादो, ओडोडा ताता कुणाला पुर्यासा , पान तास ओडोडा ताता ३० पैशाला विकातोता आन त्यास तीस पैश्यात ६ बटर याशे जे सगळ्यांना पुर्याशे , तिगाळा आमशा दोनतळया गावात ताते विकत घ्यादो एक महानु यासो त्याला सगळे तातीकर या नावांन ओळख्यासे , गावशो बायको रस्त्यात डोळे घालोन त्याई वाट बग्याशो , असो …
१९७५ शी गोष्ट , आमे जुन्या घरा होते , मे जेमतेम ५ वहराव होतो , शाळीत जा सुरवात जाल्ती बास . एकदि मे शाळीसो आलो आन ओटयोर पाय टाकिते , ताव माला बर्यापैकी पक्वानाव वास आलो , तांबडा गोड पक्का ताविल्योर कोहो वास येते तोहो वास माला आलो , माला वाटला इ पक्वान मास आत्लेन्गा सल्ले , मे दोन उडीत उबो रादो आत्लेंगा . मा भोट्या बयने माला आत्लेंगा जाता बगीला गा आन काकय ला आड्डली '' कगे , कागुळो शाळीसो आलो हा , हाउर्या टोपल्या मेरे कून उबे ऱ्या '' . आमश्या काका हयरा जालता आन त्या हारोडीतने हाउरो आल्तो , आत्लेंगा सफेद कपडा बांधलेला टोपला ठोयीलता पान मे शाळीसो आलो इ कळता खोटी टोपल्या मेरणे शार बायकाव बंदोबस्त लागलो . माई दादय असती ते मा हाता एक-अर्दी हिंगोळी लावीलोशी पान माई दादय भाटात . मायी एक काकय हान्गाते , ‘’ पोरा , दि माळता लोक भाटसा आला गा हावूरो होडयासो आन वाटणी कर्याशी तीगाळा मा वाट्याई पान हिंगोळी मे तुला देणे पान आते कय रगाजळ करो नाका !! . पान दि मावळ्या पोत माला धीर कडे हाय , मे आत दारा करते , माला टोपल्या पोत पोस्याशे उकाम्बे लागल्यात , मे काकूळ वाकूळ जाले पान कय जमे नाय . हाउरो घिती आल्ती ती बाईकू आमशा ओहोरीत मा भोट्या बय शा हरी खाटयात वार्ता करीत बेहल्ती . एक बी फेरी मे आतलेंगा मारली ताव बगीते माई एक काकय ताते बाफिल्यात ते होकल्या लागले , मे विसार केलो हाउऱ्या टोप्ल्याशा हीन्गोळ्योर माव डाव लाग्या नाय पान बाफले ताते मा तोंडा लागू शकात्यात . आमशा ओहोरीत सदा जरा काळोख आहयासो , मे संधी बगीली आन आमशी व्यान आन मायी भोटी बय बेहेल्ती त्या खाट्या खाला खिरलो आन बाफल्या तात्या बशी वाट बगीते , ताव मा काकय ने बशी हाडलीन खाटयात ठोयली . मा भोटी बय काकय ला हान्गाते '' आपलो कागुळो कडे दिख्यासो रेलो तो , खेळ्या उडलो वाटाते , पान टोपल्या मेरे उबे ऱ्या हा , नायते पटकान डोळो सुकविदे ‘’ . खाटया खालने मे सगळा आयेकाते . तात्या बशी जरा ओंडा ठोयेल्ती , मा हात पोसात नोतो , खाट हूम्बाय गाथीलेली , मे खालने हळू हळू बोटाये ती बशी मेरेला हाडली . आमशी व्यान आन मायी भोटी बय वार्त्यात ओड्यो गुतल्योतो कि हिंगात हिंग पक्कास गेल्ता , मंग मे हळूस्कान हात वर काडलोन शारू शार फोडी एका बसक्यात टुकील्योन खाट्या बुडा बेहोन खाल्यो . मा भोटी बय व्यानी ला हान्गाते '' तुमे हात लावा ना, व्यानी ने बशी ला हात लाविलो पान हाताला कै लागे नाय, ती बिचारी का बोलदे ?. व्यान कै खाय नाय बगीला आन मा भोटी बय हान्गाते '' तुमे हात लावास नाय ते , ओडे कादो लाजा त्या , मेस टुकोन देते धरा '' आंन मा बयने बशीत हात घाय्लो ते तडे हाय का ? बशी साप सूप . ताव मा बय ने बॉमबाट केलो '' ओ माज्या देवा , या पोरा पोटोर वालो लो, येणे सोकाट केला, सैतान उत्पान जाला कडणे ला ? उंडाल्याने अल्लामत ताता खाला , एक फोड पान बग्या ठोयली नाय.’’ मे खाटया खालने निन्गालो आन आत्लेंगा जाशा दारा खोपा काळोखात निक्लो , बय सो बोमबाट आईकोन आत्लेन्ग्शो बाईको ओहोरीत धावल्यो , ताव मे दारा खोपातने निन्गालो आन आत्लेन्गा पोसलो , टोप्ल्योर सा कापाड मेरे केला आंन एक मा वाट्यायी आन एक मा त्या काकयशा वाट्यायी अह्यो दोन हिंगोळ्यो दोनू खिशात घायलो आन मिन्गरणे जी धाव टिकिली तो मे उबी रयादो रुमास्तडे , मा मामारा !!
(वि.सू - माला वो प्रसंग नीट आठवात नोतो पान आमशा घरा जीगाळा जीगाळा जुन्यो गोष्टी निन्ग्याशो तीगाळा मा भोटी बय स्व. पिलीबाई दमेल या घटणेला सदा उजाळो दयाशी, माला माव ओ पराक्रम आयीकोन जाम बरा वाट्यासा. मंडळी , तुमाला पान वासोन बरा वाटले हायदे अहि अपेक्षा करते . ).


More Kupari Articles