गेल्या आठवड्यात आमशा घरा हन्पाल्नो आलो , जाम भारी लाडू बांदिलते . भरपूर ड्रायफ्रुट आन बेफाट सव . मां पोर्यांना हान्गीला लाडू खा ना , ते माई भोटी हान्गाते , जाम ड्रायफ्रुट हाय मे नाय खा तो लाडू . ते लानी हान्गाते '' Daddy ड्रायफ्रुट काढ आन मला फक्त लाडू यो कळो दे ".मे विसार केलो , का जाले हायदे आजकाल शा पोरांना ? खादो होना दिला तरी तोंडे नाहीत्यात ते , माला माये लानपनाये दि आठ्वाले , मंग मे दोगी मा मेरे भेविलो आन ३० ते ३२ वहारा अगोदर्शी एक गोष्ट मे त्यांना हान्गीली .. मे जेमतेम ८ , १० वाहराव हायने , आमशा पिप्रीया भाटात मे काक्डो खुड्या गेल्तो , काक्डो खुडोन घरा जा निन्गालो ताव आमशा आलेस काका ने मिन्गरणे हाक मारली गा आन एक कळ्याव लाडू मा हाता दिलो आन हान्गीला मायी ओबाय हनपाल्नायी आली , ओडो लाडू आपल्या गावशा बाबुकाका घरा दे , आन आहा पान हान्गीला कि '' तुम्शी वाटणी तुम्षा घरा धाडले रे , कारण तेला माव भर्वासो वाटात नोतो कि ओ लाडू बाबुकाका पोत पोसेदे गा नाय ' मे तो लाडू घेतलो आन निन्गालो . दि मावळात आल्तो , लाडू हातात हाय , भूक ते जाम लागले , मा घरषा वाटनिया लाडूई एक कळी पान माला बग्या मिळणार नाय यायी माला खात्री होती कारण माये दोन लाने गव घरास होते ते वाटनि आल्याये वैगेरे पुरावे मिटविण्यात जाम हुशार .. पान ओ लाडू खासो कोहो . मे हळूहळू लाडू सुम्ब्यादो सुरवात केली . सगळ्या मेरने सुम्बोन सुम्बोन जरा बारको केलो . काक्डो खुडोन हात निप्लोते ते लाडू इ ओळख लाग्याशी रेली . पक्को सुम्बोन लाडू जरा आटविलो आन तोंडात जा ओडो केलो . मंग तोंडात या गालूटात ने त्या गालूटात जाम लोळविलो , लाडू ला परत जरा सोबा आली , पानड्रो गुळगुळीत गोटो केलो गा आन बाबुकाका हाता दिलो , हान्गीला '' आलेस काका घर्सी लाडू इ वाटणी '' लाडू इ हालत बगीली गा आन मे ओठ सुम्बितो होतोस ता बगीला आन बाबुकाका हान्गाते , पोरा ओ लाडू तूस खाय . माला जाले शार पाय ..आन मे तो लाडू तोहोस सुम्बित सुम्बित खालो कारण ती मजा कै वाईलीस होती. इ मायी गोष्ट आईकोन मा पोर्याई शी थू केला आन उठोन गेल्यो पान मा डोळ्यात पाणी आलो ..का ते दि होते आन का आते दि आल्यात ..
Source Nelson D'Mello | 1024 views
Posted on 01 Nov 2012