कादोडी पयला वहरी दुहरो अंक - 'संजावसो हन' २४ जून २०१२संपादकीयसब्बान कुपारी भाआ-बेनी(बायकू होडोन), दादय-बाबा, काका-काकय, मामा-माई, मावशी-मावसो, बाय-फुया, मदरीन-पदरीन, भोटो बाबा-बय आन बारके टाराक-टुरुक बच्चे कंपनी, तुमश्या दरी परत एकदा आमे “कादोडी” अंक घेवोन आल्यात. यो अंक वेगवेगळ्या लेखकायी धाडलेल्या मस्त लेखायी नुसतो ‘फुलायले’. मागश्या पयल्या अंकाला तुमे जाम टूकोन धरला, आमाला ओडी आशा नवती, पास्का हण एकदम झकास गेलो, कोडे फोन आले, मेल आले त्या पत्तोस नाय, जोसेफ तुस्कानो हारख्या वसईश्या एक भोटया विज्ञान लेखकाने ते “नवशक्ती” या पेपरमिने या अंकोर खास लेख लिविलो(या अंकात आमे तो लेख थोडक्यात दिले) ताहास रॉबर्ट रुमाव याई सोताहून या अंकाई स्पोंसरशिप घेतली, आगाशीश्या आगू नानाने नुसती प्रतीक्रिया नाय धाडली ते त्याबरोबर “बारकुली” भेट पण धाडली. तुमे ओडे आमश्या पाठीशी उबे रेल्यात भगून आते आमशी जबाबदारी वाढले, तुमश्यो ज्यो कय अपेक्षा हात त्यो पुरयो कर्या सो आमे १००% प्रयत्न करो.आम्हाला खूप हुरूप आलो त्यामुळे १-२ निनावी फोन (नकारा बोलना) आमश्यामिनश्या दोगांना आले, तिगाळा आमे सगळे, जे फेब्रुवारी मयन्यापर्यंत एकमेकाला ओळखात नोते, समोरासमोर भेटले पण नोते, ते एकत्र येवोन त्या दोगा पाठीशी उबे रेले त्या निनावी फोनवाळ्याला उत्तर द्यादो. तहास ता नकारा बोलना मंजे दिट लागली पा नाय मनून काळो तीळ कोहो आपून लावित्याव तोहो आमी घेटले. इ सगळी हिम्मत पण तुमश्यामुळेस.

आपल्या “कादोडी” भाषेकरता आपल्याला खूप कय कर्या्सा हाय म्हणुनुस आमे दर मयन्याला “कुपारी कट्टा”त एकत्र भेटात्याव, आतेपर्यंत “कु-क” श्यो ६ सभा झाल्यात, आन प्रत्येक सभेला हजेरी वाढात सालले. संगीत- साहित्य या क्षेत्रात खूप श्यो गोष्टी आमे योजिलेल्यो हात, आपल्या सगळयांना त्या कामाकरता पुढे यासा हाय, खुपशे वेगवेगळे कार्यक्रम पण घ्यासो आपलो विसार हाय, या अंकाकरता कयतरी पैशे ठवा आहा आमाला खूप जणाय हांगीला पन आमे ठरविले की या अंकाय पैशे घ्याशे नाय, वेगवेगळे कार्यक्रम तहास या पुढसो अंक “नाताळ”श्या हनावेळेला हाय, तो भोटो काढयासो विसार हाय, तुमशी या करता मदत मिळदे अही आशा हाय, परत भेटो नाताळश्या हनावेळेला...

ख्रिस्तोफर रिबेलो, सोकाळावालायो हिंगो


(दुनिया मे लोगो को या चालीवर)

आपल्याअडे उन्हाळ्यात वालायो हिंगो बो हवात्यात
भाटात भाटात वालाए टापूस दिखात्यात…(2)
वाला भजिओ सवअ का हन्गो तुमाला म्येए
सकानाला बुम्ब्लाई काडीई त्योंड तू सुम्बित भ्ये
Beeda beedaa… baayaraa baayara Tara tara tara tara turu turu tururu..
हाकोटे हाकोटे भाटातने खुडोन हाड्ल्यो म्ये
कालव कालव घालोन भाजी खाली म्ये
जम्लेए सगळे पोर बांडी भूजाशी जालो बेत
ताता, बतात हिंगो प्यादो ताडीयो बांड्यो
Beeda beedaa… baayaraa baayara Tara tara tara tara turu turu tururu..
अन्द्य्रा रे दुझा रे दोपार्शो हिंगो तुमे खुडा रे
हान्शे रे सगळे रे मिन्गार्षा हेतात भेटो रे
सगळ्या कुपाऱ्या घारा वालाई भाजी होते चारदा
लगनात मटण-चिकन आठवड्याला तोडास बायारसा
Beeda beedaa… baayaraa baayara Tara tara tara tara turu turu tururu..
कोडा ही कोडा रे मटन तुम्हे हाडा रे
हिजवा ता हिज्वा ई वालाई भाजीस सर्रास रे ....

-- एडवर्ड डिसोझा, वाघोलीसंज्याव बावतीस (सेंट जॉन द बॅप्तिस्ट)


“स्त्रियापासून जन्मलेल्या मध्ये धन्य” आहा खुद्द येशू ख्रिस्ताने ज्या बद्दल हांगिले, त्या संज्याव बावतीस सो आज 24 जूनला आपुन हण साजरो करत्याव. आपली देऊळमाता सगळ्या संताये जे हण साजरे करते ते त्या मृत्यू (पुण्यतिथी) दिहा. पण संज्याव बावतीस ओ एकुस अहो संत हाय ज्याव हण त्या जन्मदिहा हवाते. (बी जन्मदिहा फक्त येशू ख्रिस्त (२५ डिसेंबर आन मरियेसो ८ सप्टेंबर आपली देऊळमाता साजरी करते.

संज्याव बावतीस बद्दल आपल्याला सगळा माहीत हाईस, तो येशूसो महाभाहा कोहो लाग्यासो, लोकांना बाप्तिस्मा कोहो द्यासो आन लोक जिगाळा त्याला ख्रिस्त समज्या लागले, तिगाळा त्याने नम्रपणे मॅ ख्रिस्त नाय इ कहा हांगीला अन शेवटी हेरोदा राणीने कपटाने त्याव शिरच्छेद कहो केलो, येई आपुन बायबलमिने वाशित्याव.

आपल्या कुपार्याी समाजामिने या हणाला पयला खूप महत्व होता. आपलो समाज मुळात कुणबी. २४ मे ला रोहिणी नक्षत्र लागला गा, हेतामिने नांगरणी करोन ढेपे फोड्याशे, आण ७ जूनला मिरीग(मृग) नक्षत्र लागला गा पाणी पडलोस पाय आण मग पेरणी कर्याग सुरुवात हव्याशी. मिरीगात पाणी जर नाय पडलो किंवा कमी पडलो, ते गावाशे सगळे पोरे ३-४ भोटया माहनाहरी रोज हांच्या पारा दांडीला दांडी बांधोण क्रॉस बनव्याशे आण गावश्या खृसोरती “संज्याव बावतीस पाणी दे, पाणी दे नाते मराण दे (कायिक टारगट पोरे मराण ऐवजी वराण बोल्याशे).डोंगरावरशी काजेळी...(आते शब्द आठवात नाय.) अही पाण्याकरता प्रार्थना कर्यायशे आण तुमाला खरा हांगाते संज्याव बावतीसश्या मध्यस्थीने 24 जून पर्यन्त धोधो पानी पड्यासो. आण आपुन पेरलेला बी हिरवागार होवोन बायार यासा.

बी माला लाणपणी संज्याव बावतीस सो हण आवड्यासो त्या मांगसा कारण धारामिने बनविलेली “हिंगोळी”. एकत्र कुटुंबमिने जिगाळा हिंगोळ्या पुराण बन्यासा तिगाळा हिंगोळी बण्याश्या आधी ता पुराण खादो जाम मजा याशी. आण एकदा हिंगोळ्यो भुज्या लागल्यो गा मग ती खापरीतने भुजोन फिरवे गणाय ताव ती ओटयोर पोश्याशी. गावामिने घरोघरी हिंगोळ्यो तरीपण या घरश्यो त्या घरा ४ वाट्याशो. पडत्या पाण्यामिने ओटयोरती हिंदाळ्यामिने गराम गराम हिंगोळी खादो खूप मजा याशी.

तर ओहो आपलो संज्याव बावतीस... बायबलमिने तो पाण्याने बाप्तिस्मा कर्या सो, पण आपल्या कुपार्यावव विश्वास हाय की तो आपल्या करता पाणी मांगाते. त्या मध्यस्थीने नेहमीस आपल्याला भरपूर पाणी मिळाते आण कात्येस पाण्याई टंचाई ये नाय आही आपल्या वाड-वडिलाई श्रद्दा हाय, त्या हणायो आपल्या सगळ्यांना शुभेछा.

रे फा. स्टिफन मच्याडो, आगाशी चर्च॰
आपली भाषा आण आपुन


आपलो "कादोडी”ऑ पयलो अंक मिळालो. वाशाश्या अगोदरूस, अंक बगोनुस खूब मिन्जे खुबुस आनंद जालो. आपली मरात साललेली भाषा तुमशा हारके तरुण पोरे वासव्या लागल्यात इ आयकोन खूब बरा वाटला.

जगापाठीयोर खूब भाषा बोयल्यो जात्यात, आन आपल्या भाषेओ प्रत्येकाला अभिमान आहात्ये; पण आपल्या अडे का जाल्ये कइस कळे नाय? कय लोकांना "कादोडी" भाषाइ लाज वाट्या लागल्ये. खास करोन घरात आलेली नवी नवरी, त्यांना मराठीआ कुत्रा कडे नि कहा साविला इ एक शोध्या हारका हाय, त्यापायान घरसा वातावरण मराठीमय (अशुद्ध हा!) जाला. नाय ते का? भय्याहरी पिवर कादोडी बोलणारी बय, नातवाहरी, " जोरांशीन गावू नाको, धापकन पडशील" आहा वेगळास मराठी बोल्या लागली. नातू पण "मम्मी मम्मी जिन्याखाली उन्दूर मेलाय" आहा उन्दिरछाप मराठी बोल्या लागलो. अलीकड्शी गोष्ट, हप्ताळसो नाको. एक ओबाय नव्या अॅरक्टिवावर आपल्या लान्या पोरीला घेवोन आली. समोर पोरिओ पद्रीन उबो होतो. पद्रीनने आपल्या भाषेत खबरबात विसर्याल सुरवात केली पण कुमारी कय कादोडी बोल्यासा मनोर घे नाय. ती मराठी साव्या लागली. पद्रीनने पण मंग कादोडी बानो होड्लो, जाताना पद्रीन गमतीये फिल्यातला हांगाते "मा बरोबर येता!' फिल्यात खूब लानी होती, ती का बोल्याशी. नुसती नाय नाय बगून मुंडी हाल्वितोती. पोरी मम्मी मिन्जे कुमारी पोरीला हांगाते, " पोरी जा! पद्रीनशा हरबर जा." इ तिने मराठीत किमान सातवेळा बोयला! आहा आपला मराठी.

आपल्या पोरांना मराठी यासा नाय आहा या आजकालश्या जोडप्यांना कादो वाटाते इ एक बोट्टा कोडा हाय? (पोरे इंग्लिश शाळीमीने जात्यात भगून त्यांना तहा वाटात्ये हाय दे) त्यांना मराठी यासा नाय या एकास धास्ती पायान ते आपल्या पोराहरी अशुद्ध क होयेना पण मराठी बोल्यासो आटोपीटो करत्यात. आम्हे लाने असताना आमशाहरी कुनुस मराठी बोयला नाय तरी आमाला मराठी येत्ये. आपल्या अडे आलेल्ये गुजराती, मारवाडी आन भय्या जकले मराठी बोलू शकात्यात मंग महाराष्ट्रात्शा मराठी वसयमीने रेवोन आपल्याला मराठी क नाय येणार? जर अपुन सगळे नव्या पिढी हरी कादोडी बोयला नाय त्ये येत्या कायिक वहारात आपली इ रेवाळ्या हारकी गोड भाषा इतिहासजमा होयदे आन रेदे का विसार करा. कादोडी इ आपली मायबोली हाय ती बोल्यादो लाज नाय वाटली पा. आप्लीस हाय ना ती भाषा. जीगाळा अपुन पयलो शब्द बोयलो तो कादोडीतूस बोयलोतो ना, मंग आते कादो आन कड्शी लाज. तुम्हाला हांगाते माई बायकू अस्सल मराठी हाय पण ती पोरा हरी सुकोन सुद्धा मराठी बोले नाय तर कादोडी बोलाते, याव माला खूब अभिमान हाय.

म्ये १९८८ पासून आपल्या कादोडी भाषेत खूब एकांकिका लीविल्यो, नुस्त्यो लीविल्यो नाय तर त्याए खूब प्रयोग पण केले. आजू-बाजूशा पॅरीशमीने पण मायो एकांकिका जाल्यो आन लोकांना त्यो आवड्ल्यो. मा हारके "कादोडी" भाषाय वेडये आपल्या समाजात खूब हात. मंग संगीताने आपली भाषा, आपली संस्कृती लोकांना दावडणारे बबन गुरुजी हवो गा फिलीप दमेल हारके चित्रातने आपलो समाज रेखाटणारे चित्रकार हवो, अर्नेस्ट हारके तरुण चित्रकार सुद्धा. कुनेतरी आपल्या भाषेत आमंत्रण पत्रिका छापिल्योर खरोखर त्या कवतुक करया वाटेदे.

आपलो यो कादोडी अंक आपल्या समाजातले होतकरू लेखक, कवी यांना एक प्रकारसा व्यासपीठ ठरावा. आपल्या समाजाने आपल्या कादोडी भाषेत खूब लेखन करोन इ भाषा टिकवोन ठव्यासो प्रयत्न केलो पाय. येत्या कायिक वहरात आपल्या कादोडी भाषेई लाज वाटणार्या,ला कादोडी भाषेओ अभिमान वाट्या लागलो पाय. कादोडी अंकाई लोकाई वाट बगीली पाय आहा काम तुमाला कर्याटसा हाय. तुमाला खूब खूब सुभेच्छा..!

-- सिरील मिनेझिस, आगाशी
मा जुना घर!


म्ये लानी होती तीगाळा आख्खे कौलाये भोट्ठे घरे होते. आते तहे जुने घरे कडे बग्या मिळात नाय, पन अह्या भोट्ट्या घरात म्ये नव वहरे रेले. माला ता घर कहा होता ता पक्का मायती हाय. मा घर जाम भोटटा होता, मंजे लोक पण घनास. मा बाबाये स बाहा आन बाबा धरोन सातजने एका घरात र्या शे, आन त्यांशे आख्खे बिराडे. आन लाने पोरे ते बग्यादोस नाका, नुसती गर्दी पड्याशी घरा दापुडे. आम्शे खेळ पन तोडेस गा आन मारे पन तोडेस. आम्श्या लान्या पोरात उसका-उसकी सालूस पण बयबाबापोत यो कळी कते गेल्यो नाय. घर आख्या कारवी कुडा बायारने हारविलेला! घराये सात भाग. मिन्ने कारव्यो हारक्यो- हारक्यो बांदिलेल्यो आन हारविलेल्यो. आक्ख्याआ आंगाळ एकुस आन ऑटो पन एकुस. शाळीत जावोन आले गा हान्शापारा ओटयोर आम्श्या पोराटायी नुसती गर्दी पड्याशी. दापुडे, आंगळात दोन भेंडीये झाडे होते आन एक बदामा जुना झाड होता. बदामाला मा काकायो गायी बांद्याश्यो गा..आन भेंडी झाडात तोहोस फाट्को सादर बांदोन हिंदाळो केलतो, आमे पोरे पन कय कमी गा! हिंदाळो ओड्या जोराये गाव्याशे ना तो! एकदा म्ये गायश्या पायाबुडास आपटालती ,पन काकायो गायी पण मानसाळलोत्यो ......

पयले घराला बारके गोळशे गावठी कौले होते पण ते नंतर गळ्या लागले मंग ते बद्लोन विलायती मंगळुरी कौले घायले. घरा दारपुड मंजे लांब लसक आन रुंदा पन खूप होता. घर मंजे जाम उस्श्योर! सात पायर्योळ घराला. दोन काकादरी दापुडे हिंदाळे होते गा आन चार काकादरी माश्यो. आन माळोर जादो दोन जिने, एक बायारणे मंजे दारपुडणे आन एक आमश्या काका घरातने. बायारसो जीनो मंजे पक्क्या लाकडाव ठोकील्यालो होतो आन आतमिन्सो जीनो फळ्यो ठुविलेलो हलत्या पायऱ्याव! परतेका भागात कारवी कुडाला तीन-तीन खुटे. खुटयाला तांबड्यो टोप्यो गा आन पोन्या-सदरा टांगलेला अह्यासा. ओट्या मिनश्या मीने उखाळ-मुहाळा होता. घरश्यो बायको भात तन तडेस हड्याशे. रात जाली गा घरात काळोखकिट. लायीट नोती पयली. तीगाळा मंग दिवो, कंदील इस लाव्याशे. बयश्या जीन्याबुडा एक टांगव्यासो कंदील होतो. घरात सगळ्यापा काशिये कुपिये दिवे होते. सुलीपुडे परतेकादरी बब्म्बाळो दिवो होतो. आन खोलीत जाड्या वातियो दिवो होतो. या ओडयोरूस घरात प्रकाश!

सुलीपुडे कोपर्यावत भोट्ठो बांबूओ कळगो आन त्यात भात ठुयीलेला अह्यासा, माती सूल सयपाक कर्याकदो , धान कर्याआशी हांडी, जीवना कर्यास मातीआ तीजाल, रस घ्याशी उळकी, भात फुन्यासा विणलेला हुपडा, तांब्या पितळीये थोडे पशेंडे, तपयले, समशे - समश्यो, थाळयो, घरसा दगडा जाता, रोटीआ दळान कर्याकसा घरट आन सुली बाजूलशी पानेरी आहा ता सुलीपुड. सगळे भांडे पानेरीवर हारके लावोन ठोयलेले आन कोपर्या,त चार पिंडे लाकडाये. मींगारा परतेकायो दगडायो नाते माती डवश्यो सुली. मींगारास एक बेडा होता. त्यात पेंडो भरल्यालो अह्यासो आन रातियो गायी बांद्याश्यो तडे. घरात सात निहनी होत्यो आन स लाम्ब्यो ऐळयो आन ई सगळा सामान पन बेडयातूस ठविलेला अह्यासा. शीस ठव्याश्यो मुजी, केळे पिकव्याशे पराडे बेड्यात निट र्यासशे. कणेरी, हुक्क्या बुंबला जीवनाला, भूज्लेल्या काड्याला आन कालवाणाला सव त्या जुन्या घरातूस खरो लाग्यासो. घरात दादितन सगळे तांबडे लुगडे आन सोळयो घाल्याशे. आमे पोरे लपा-छुपिला पंधरा-वीस जने एका डावात खेळ्याशे. एकेकोरसो राज्य स-स दि पुर्या‍सो. रजेत ते हाकोटे कडे कळग्यात नाते पेंड्यात जावोन निक्याशे ते हानशे एकदास बायार उत्र्याशे, अर्दे माळोर लप्याशे लपाछुपी खेळात! हजार हजार चीण्याये पैजीये खेळ, पावसाळ्या अगोदर गोटे खेल्याशे. तीगाळशे घरे हेना-मातीये क ना अहो, आपल्या सोयीये भारी होते! गर्मी दिहात घरात गराम जास्ती होत नोता करान वरती थंडे कौले आणि बाजूला हार्विल्यालो कुड. पाहाळ्यात घरात पाणी यासो घाबरो कत्तेस नोतो, करान घरे पक्के उस्श्योर होते. थंडीत घरात कांबळ नाते वाकळ घेवोन निज्यासा सुख वेगळास होता.

भाटश्या बायीवर भोट्टो राट होतो. घरशे सगळे पानी तड्नेस हाडतोते. आते यातसा कय आपल्याला बग्या मिळे नाय. आते फक्त जुन्या घरायो आठवणी आयक्या मिलात्यात. तीगाळा घरशी बाळगीलेली कोंबडी वीस दि घारा याशीस नाय आन एकविसाव्या दिहा बारा पिला हरी एकदास घारा याशी. तडे कडे पेंड्यात ताते आन पिले काड्याशी. ई कय बग्या मिळणार नाय आते. बयश्या कानाशे धर्ण्याये हलकी आन कानात चार चार घुडायो वाळ्यो आन बाबा कानाशी वाळी कडे आते बग्या मिळणार? बांडी भूज्यादो, कडे आणि कही भूज्याशी? ओडो वेळ कुनादारी हायदे? तीगाळशे शिसार्याआये, खोबर्याजये आन चीण्याये खेळ आते कडे रेल्यात? राट कडे बग्या मिळदे आते! आते फक्त राटाये बाजुशे कुजलेले कागुळे हापडले ते आपला नशीब!!

आते सुधारणा ओडी जाले कि "बय बारा वहरायी आन पोरी वीस वहरायी पाय" परतेक घरात इ कडे शक्य होणार हाय गा! याकरता परतेकायी प्रयत्न केलो पाय. आपले भाटे, जमिनी, जुना घरसा सामान सगळा दरी ठव्यासा आन मह्त्वा मंजे आपली पारंपारिक जुनी संस्कृती, जुनी कादोडी भाषा दरी बाळगास बाळगा........

फ्लोरीटा तुस्कानो, घोसाळी - नंदाखाल
आखिरिओ सव्सार


पाहाळ्याला अजून आव्कास हाय स मैन्ये पान आदिपासुनुस सुरवात. ई भर ता भर सालूस. हुक्के बुम्बुल, सीस, मिठा, बी-बियाणा, लाकूड, गवात-पेन्डो, कोलूम, रायामबो, वाल, मसालो, मुन्ड्यासो आंबो माई याद दर्या गेली कोडा हामटो. सल कामाला लागात्ये.

मा मिन्ये हिनवारा बजाराशे हुक्के तीनशे बुम्बुल हाड्ल्ये, हेपाट बगाड कापौन सापसूप केल्ये गा दोनतीन दी निम्ब्रात हुक्विले. पत्रा डब्यात भरोन गुणित डबो बांदोन माळोर लीक्वोन थोविले. ओड्या होया नाय भगुन बंदरा जासा. बंदरा जासा पान न्यासा कां? ओड्या बुम्बलाय होया नाय. एक दी का केल्या दोपार्शी दोन वास्ता निन्गाली अर्नाळा बंदरा. थोडा हेन, पिठी केल्ती, वाक्, वावळी पुडयो, आन वालायो हिंगो बाफोन टोपल्या भरोन दरी पिवशी टोपल्योर घेवोन घोहालकरा हिवारातने अब्राम नाक्योरने आगाशीतने अर्नाळा गेली. एका ठिकाणा बेहली. पोर्या ई हुतेर्याद, मान्देळे, हुकटीओर हिंगो घेतल्यो. डोकरीने खळा हारव्यादो हेनोर सगळी भेळशेळ टोपलाभर हुक्का मावरा दिला. वाकोर आन वावळीओर गोलीआ खारा एकीन्ये दिला. बास जाला, हुक्विला पाख्विला आन भरोन थोविला.

कोडभर हुक्यो हावळयो बाईत भिज्वोन वळळ्यो. वाक गा हाव्ल्यो घेयोन गेल्यो कळबा राणा दोगी उकंदी हाडया. कळबाराणा पोस्ल्ये, आन उडी पडली वाकोर न् हाव्ल्योर. दोन भोट्योजबार गुणी भरोन हाडल्यो उकांद्याव. एकीला मावशी हान्गताखोटीस तिन्ये एक कलानग्डा दिला गोड हाकर. दुहरेदिहा हाकोटेस वाक भिजवोन उकंदिये जोडे बांदिल्ये. बारा जोडे जाले त्यें टोकार टांगवील्येला होतास त्योर टांगविले. उकांद्या काम जाला आत्ये सीस.

गावाशी भागी सीस अर्धी गुण आलती. होक्लोन हुकात घाय्ली आन आंग टाकीला त्येसीस पोरार्ई सोरोन बोरावाळीया सवादी घायली. उठली गा सीस काटोळली, काटोळोण वीसेक उंडयो जाल्यो. मुजीशी परशी सीस काडली आन नव्यो उंडयो खाला भरल्यो गा वरती काळी सीस भरोन सिश्याई मुजी लाखोन थोविली. शिश्या काम जाला. बारीकसारीक कोडा सामान भर्याोसा येद् पान ये नाय.

दारापुडश्ये पंदरा भारे लाकुडाय घेतल्यात. आन गिरनीसा दोन खांडी हाड्ल्ये. पय-पैराटये, हेनी, शार ओजे पात्यो, दोन गुणी खाखांडयाव, एक गुण हालाई, वांग्याई कुडीय दोन भारे, ताडाय थोप्ये आहां करोन भयश्या पेटीओरसा मास्डा भरला.
उकांदिये गोंडे, राजगीरो, पालक, राय हुकात घ्याल्त्ये. सगळा वेगळा वेगळा हाल्कंडया कुटीला, आन सगळा भूकाटाई गुण भरोन ठोविली. उकांदिया बी काळ्या कुप्यात भरला पेटीत कथना खाला लीक्वोन थोविला. जुन्या तीन शार डब्यात पालक, राय, राजगिर्याी बी भरला आन पेटीआ मेरे थोविल्ये. वाल राखीलतो. हुकाट खुडला आन हुकात घायला. हुकाट कुटोन वाल साफ केल्ये आन हुकात घ्याल्ये. पोराना राजा आले त्यें आयकात्यातगा, सोरोन करद्यावालीला दिल्ये. दोन पायली जाल्ये. माती लावोन भरोन थोविले. सात आठ हाल्त्ये बांदोन थोविल्ये. थकली लो ई निम्बार कुण घेद्ये दोखोर बास कोडा भर्यायसा. नाका ओ सव्सार. हान्दिफटीत होता ता खपला.
पोराना रजा आले, अन्तोनने काल हान्गील्तास, उद्या मिठा हाडया कुनाला यासा हाय त्यें पास वास्ता निग्यासा हाय. निज कादो लागात्ये पोरार्ई, रात्शोस टोपले, गुनी तयार. उठले गा तोन्डे धोवोन, शा पेवोन अन्तोनशा मांगे निंगाले. अन्तोनशी कावड धावात्ये बास. आमे थकले, त्याला हांगीला “जरा हळू ना” पन अंतोन कय केल्या आयके नाय. हिवारातने, भाटीआ बंदोरने, उमराळयातने, होपारा पोसले. सव्काडीआ बाईओरणे घाहाकारा भाटातने एकदासे पोसले मिठागरात. राहिओरसा मिठा भरला आन अंतोन कावड घेवोन आमाला टाकोन आहात आहात निगालो. ऑ देवा तडने काळो भोटो जबार महानु जोराय आड्या लागलो तहो टोपला मीठां घेवोन धाव मारली. सुम्बळ खान्डोरूस रेली, कहेतरी घाहाकारा भाटात पोसले आन डेवरला टोपला आण बेहले आंब्या झाडाखाला राटा मेरे. होपारातने निगाल्यो आन घारा पोसले. मिठाया पन काम जाला.

तीन खांडी भात कनग्यासा काडॉन नंदाखाला पात्रीस शेठ्श्या गिरनीत द्ळ्यादो हाटया गाडयातने दोपारसा दोन वास्ता निला. पायलीभर वेन्ये साउळ पिशवीत घेतले, भडडी पिठाय लाडू कर्याय. कुन्डो एका गोनटीत घेटलो आन दोन गुणी तुहाशो भरल्यो. हेनी घाल्यादो आन दाब जालेय तडे ताक्यादो. आन रगडा गाडा घेवोन सात वास्ता आला. दिहास्सो दी भरलो वखत खपात आलो.

उडडदाई अर्धी गुण हिंगो हुकवोन उडूद् जाले दोन पायली. पापड घाल्यात. नळद्या काना पडला आन ती हान्गात्ये मे पडगय करत्ये आपून पापड घालो. रातश्यापरा पीठ बांदोन थोविल्यो आन दोगी सोगी जम्ल्यो. काकनेय वळ्यो केल्यो , गोल्ण्यो केल्यो आन पापड कर्याप बेहल्यो पोरे आयकात्यात गा गोल्ण्यो सोरोन सुलीत भूजोन खात्यात बास. हर्याआला का हान्गीला हाता दांडी घ्या आन हायला बेहा, खातोर नंदार द्या. दोन निम्ब्रे हुक्वोन पत्रा डब्यात भरोन उकांद्या टोक्रोरूस तान्गील्ये.

मसाल्या सामान गा खुराब विरारश्या सुनिलश्या दुकानासा हाडलो. मसालो निम्ब्रा हुक्वोन दळळो. मसालो मस्त जाले. सात आठ ढोरे खा कोडा लागत्ये. तरी पन लोद, ओलातोर सलेय. स गाडे पेंडॉ, तीन गाडे गवात हाडल्ये. पन कमी होयदे आन पहाळयात कडे जासा भगुन उद्या डोंगरा गाडा जाय. त्याई मावटी भर्यामशी, का का भर्यागसा विसरला हर्याोला. साउळ, बुम्बुल, बताते, काळ्या रवयशे वांगे, मीठा, हळद, मसाल्यो आन तेली कुपी. मावटी भरोन जाली. आत्ये कां रेला गा. हरो हान्गाते, माखांडाओ डबो, बडे, आन मांगल्या गाड्यात थोव. पातेरात्सास गाडा गेला डोंगरा. दोन धीहान गाडा बिदितने पेन्डो-गवात घेवोन खळ्यात उबा केला. आन पोरे वाट बागीतोत्ये त्याना हान्गोन थोविल्ता डोंगरसा धान हाडद्यात. भुर्या-, सड पेंडोर आन गोन्टाई मावटी खाला काड. डेवरता खोटीस पोरायी उडी पडली डोंगरश्या धानोर. अड्ने तडने बोशाटये मारोन खप्विला.

वैशाकातु पडाळात पेन्डो –गवात भरला. भुकट भाकाट रेल्या ता पुंज करोन थोविलो. आत्ये भोटा काम रेल्ये ता केलास पाय नाय्तेय पुद्श्या वहरा खासा कां? आबोरने ढग धाव्या लागल्यात. हेन्खळ भरली हाय.राब कात्ये होयदे. पोरांद्यो खेळ आत्ये बंद करा, कावळात्ये बगा. हेन काडयासा हाय. मेय तुमादो दोदल करने. दोद्याई कणेरी पाय ती पान करणे ,पोरे तयार जाले. हाकोतेस पावडा आन टोपले गुणी घेव्योन लागले कामाला. ओळीत नेवोन टाका हा हेन्खल खाली जाली आन दोपारसा भूकटायो हावळ्यो, वान्ग्याई कुडी, आम्ब्योव पाल्यो सगळा आथरला. राबा तोंड आबोरूस. हान्श्यापारा पास. एक्दासी हुटली लो. सुलन्याशे हान्ग्याशे मिरिग लागले तरी गाहा धोरातेस.
एक हाट आली आन धावपळ जाली मिन्गारश्यो हेनी, हालेय भिजले त्योर मेन् कापाड टाकीला. बी भाताव पराडॉ नळ काडलो. बिभात काहा नुसता मोत्यां दाणे. रवो कर्यात भोटया उखांड्या झापात दोन पायली भिज्विल्ये खारीती टाक्या. शार दिहान रुई दिख्या लागली. आन पाणी हान्गात्ये मा पुड्ये तुमे जासे कडे. राब साप्सुप केल्यो आन भात पेरला गा हातअळी फिरविला. जुरशी वारमोड जाली, केळी मोडल्यो. माडायो हावळयो पडल्यो, सगळा सोकाट जाला. हावळ्यो विल्ल्यो आन मिन्गारा बांदिल्यो. थोड्यो काडयो काडल्यो. आवान जाला भोटा. उखळन् केली. पाणी जोराय लागलो संज्यावशा हन् जालो गा उत्र्याशे आवजो कर्याय. शिकल कर्याा गेल्यात कांबळ घेवोन. दोन माहणे येद्यात. आवान खिन्ला, मिने मिने झिम झिम पाणी येते. इर्ला काढता थोविता वखत गेल्यो. कुणा मेण कापाड हुरात्ये त्यें कुण मुत्या उठात्ये, मुठ बांदोन उडवा केला. आन दोपारशे आव्यादो डोक्योर भारे घेवोन हेतात उतरले त्यें हांज होये तोपोत माग्शे मुठ खपले गा हात धोवोन हेतोरने बार उतरले.

तेरेजा थिओफिलो डिसोजा, कांदोक नं. १, गास
वेळूस नाय


आग लागो त्या तुमश्या नोकरीला आणि ओवरटाईमला. मे बाय हाकुटे शारला उठोन जी कामाला झुपाते ती रात्शे अकरा हवात्यात तव जागीस हाय. आन तुमसा आपला बरा हाय हाकोटसा उठ्यासा, गराम-गराम डबॉ घ्यासो आन रात्सा घरा येवोन जीव्यासा आन निज्यासा. आख्ख्या दिहात का जाला, पोराव अभ्यास जाले गा ते शाळा-कॉलेजात जातात गा, आमशी तब्येत कही हाय, घरात डोकरे दोघी कहे हात, ते ओखान-पाणी हारके घेत्यात गा? हिवार-भाटास्सा काम कहा का सलले? बाजार पाणी, हिपणा-झुपणा कहा काय होते? तुला कडे पावण्या घारा जादो टाईम भेटादे गा नाय? मावरा-पाणी, सगळो घरसो संसार भरलेलो हाय ना?

कते कय विसरया घेटला गा माला वेळूस नाय, वेळूस नाय. आज आम्हाला आयत्वारश्या रज्या दिहा पण ओवरटाइमला बोलविले ई फक्त हांग्यासा सुसाते पण मे हान्गाते नोकरी करोन, पैशे हाडोन दिले आन सगळो संसार भरोन दिलो मंजे सगळा पुरा जाला आहा थोडीस हाय. आपल्या पोरांना नाय गा वाटे एकदा बय-बाबा बरोबर देवळा-रावळा, फिर्याादो जाय. पावणे-पुवणे कते मामारा जाय. कते कय विसरायासा खोटी बास गा माला वेळूस नाय. माला कामोर जासा हाय’ ईस एक कानी समोर ठव्याशी बास मिन्जे परत कय बोल्यादो नाका. पण मा धन्या, पैशे मन्जे सगळा नाय. आपल्या दोन पोरोर बग्यादो, त्या बरोबर बोल्या-साल्यादो तुला वेळ नाय. आपले दोन डोकरे घरात हात त्या चौकशी करयादो तुमाला वेळ नाय. आपल्या पै-पावणे, सगे-सोयरे, बेनी-हेनी घारा दुखल्या-खुपल्याला जादो तुमाला वेळूस नाय. सलापसा घर आन आंगळ्यात मारुती उबी केली पण त्या घरश्या माहानाकरतान आन गाडीत भेवोन कडे जादो वेळ नायदे ते पैशे कमवोन न्याशे कडे?

उद्या आपले पोरे आपल्याला हांगेद्यात, नाका आमाला बंगलो गाडी, नाका आमादो कपडे भारी. आमाला पाय तुमसो वेळ आन फक्त तुमसो वेळ. आम्शे तुमे मालक बनो नाका तर बना सुजाण पालक. करा हात पुढे तुमशे प्रेमाये आन घ्या वेंगेत मायेने आमाला. जा देवळा-रावळा जोडयाने आन आमाला पण लावा त्या देवळाशी ओढ. आजश्या संजावश्या हनादिहा आपून सगळ्या कुटुंबाश्या लोकई ठरवो कि सगळ्याई एकमेकांदो वेळ काढोन एकमेकाबरोबर रजार जाल्योर, सुखदुखायो तह्योस घरशो-दारशो कान्यो सगळ्यांना हान्गो. डोकरो-डोकरी मेरे भेवोन त्या चौकशी करो आन मंगुस जीवो. तरूस आपलो संज्यावसो हन आपल्या कामी आलो आहा आपून समजो.

पीटर थॉमस दोडती, दोडती आळी, निर्मळ
ब्रास बॅंड महोत्सव (बातमी)


नंदाखाल (पॅक्सन रॉड्रिग्ज) :- पास्का हणादिहा(०८ एप्रिल २०१२) होली स्पिरीट क्रीडा मंडळाने ब्रास बॅंड महोत्सवा आयोजन केलता. या महोत्सवात १) करास बॅंड पथक, नवाळे, २) जय हिंद बॅंड पथक, गास, ३) वाडीकर बॅंड पथक, गास, ४) अर्चना बॅंड पथक, भुईगाव, ५) डायस बॅंड पथक, भुईगाव, ६) रुमाव बॅंड पथक, नंदाखाल आण ७) मिलन बॅंड पथक, सातपाटी या बॅंड पथकाई भाग घेतलोतो. या वेळेला जुने आण नवीन मराठी – हिंदी पिक्चरशे गाणे ऐकोन सगळ्या मनोरंजन झाला. कार्यक्रमा सूत्रसंचालन प्रशांत रॉड्रिग्ज आण मार्शल कोरीया याई केला. ओ महोत्सव यशस्वी करन्याकरता मंडळाव अध्यक्ष जॉन मच्याडो, कार्याध्यक्ष अॅजन्ड्र्यू लोपीस सर व इतर कार्यकर्त्याई खुब मेहनत घेतली.
कुपार्या पोराआ मायशी …. ! “नवशक्ती” पेपरमिनने (संक्षिप्त) साभार


आमच्या वसईत दोन बोलीभाषा प्रामुख्याने अस्तित्वात आहेत. दक्षिण वसईत बोलल्या जाणार्या बोली भाषेला `वाडवळ’ भाषा म्हणतात तर उत्तर वसईतील बोलीभाषाला `कादोडी’ असे संबोधिले जाते. गेल्या वीस-तीस वर्षात, शिक्षणाच्या वेगवान प्रसारापायी इथल्या शेतकरी जीवनात भन्नाट बदल झाले. सगळी व्यवस्था उलटीपालटी झाली. इथली तरुण मंडळी शेतीव्यतिरिक्त अन्य भिन्नभिन्न व्यवसायाकडे वळाली. मुलेमुली शिकून सवरून परदेशी वास्तव्याला गेली. त्या एवढुशा प्रदेशातील डॉक्टर्स-इंजिनियर्स नि अन्य नाना क्षेत्रातले तज्ञ मोजण्यास हाताची बोटे अपुरी पडू लागली. कुटुंबात संवादासाठी मराठी इंग्रजीचा सर्रास वापर होऊ लागला. तेव्हा उ. वसईतील काही चोखंदळ तरुणांच्या लक्षात आले की, आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष होते आहे. मालवणी सारखीच काहीशी तिखट, शिवराळ असलेली ही भाषा, दुसर्या अंगाने प्रेमाने नि वात्सल्याने ओथंबून भरलेली आहे.

नुकताच, आमच्या काही उत्साही तरुण मंडळीनी एक ई-अंक काढला आहे व तो `कादोडी’ भाषेतच विविध अंगानी रुजलेला आहेत www.onevasai.com या संकेतस्थळावर या अंकाची kadodi_lst.pdf फाईल उपलब्ध आहे. श्री. ख्रिस्तोफर रिबेलो यांनी संपादित केलेल्या या अंकात लेख, कविता, गोष्टी यांची मस्त सरमिसळ आहे. मुखपृष्ठावर तर उ. वसईचे जुने वैभव दिमाखून उठून दिसते. संपादकीयात `कुपारी-कट्टा’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना मांडली आहे. (उ. वसईतले लोक `कुपारी’ नावाने ओळखले जातात’) आगाशीच्या सायमन रॉड्रीग्जने तर स्पेन भाषेचा हवाला देत’, ज्याला कुणाला आपली मातृभाषा बोलता येत नाय, त्या हारको मूर्ख माहणू दुहरो कुहनोस नाय’, असा प्रेमळ दम दिला आहे. वाघोलीच्या डॅनियल मस्करणीसने तर `कुपारी डॉट कॉम’ द्वारे कुपारी संस्कृतीची नाळ टिकवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. गासातील तेरेजा डिसोजाची `पाखडान’ स्टोरी तर मूळात वाचायलाच हवी. वटारच्या सुनील डिमेलोने आपल्या `कुपारी’ कवितेतून तथाकथित आधुनिक पद्धतीद्वारा होणार्या उधळपट्टीवर चपखल टीका केलीय, तर आगाशीच्या राजन डिमेलोने `बोल, मरे बोल’ (मरे हे मेरीचं लाडाचं नाव) या कवितेतून जुने, कौटुंबिक शृंगार दृश्य नजरेसमोर उभे केले आहे. त्यावर कढी म्हणजे बोळींजच्या स्टीफन वाझने `कोलावरी डी’ च्या धर्तीवर `खोल्यावरी (केळीची पाने चोरून कापून व त्यावर पैसे मिळवून) दी (दिवस) काढणार्या एका अशाच पासू काकाच्या कुटुंबाची कैफियत मांडली आहे.

मग, या सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाचे नि कर्तृत्वाचं मालवणी ठसक्यात कौतुक करीत म्हणावेसे वाटते, `या कुपार्या पोराआ मायशी…!

जोसेफ तुस्कानो, गास
धिना धीन धा (बातमी)


मुंबई दूरदर्शन वर होणार्यात धिना धीन धा या कार्यक्रमात आपल्या नंदाखालश्या घोआळी गावश्या यंग स्टार संघ याई पास्का हणादिहा(०८ एप्रिल २०१२) हानश्या पारा ७.१५ वा सहभागी झालते विशेष म्हंजे संपूर्ण कार्यक्रम या ग्रुप ने सादर केलो, या कार्यक्रमात या अगोदर फक्त एका ग्रुप सो एक कार्यक्रम सादर झाल्यात त्यामुळे या ग्रुप सा खास अभिनंदन, यात सहभागी झालेल्या सगळ्यान्शे नावे खाला दिल्यात.
कलाकार :- ऑलिसन तुस्कानो, एरिक तुस्कानो, विन्सेट तुस्कानो, क्रिस तुस्कानो, स्वप्निल तुस्कानो, क्लिप्टन तुस्कानो, ज्योनस परेरा, बॉनिवेंचर तुस्कानो, लिऑन तुस्कानो, अॅनशली तुस्कानो, रोशन तुस्कानो, डेनिस तुस्कानो, ब्रिनल तुस्कानो, ऑल्विया तुस्कानो, सोनम तुस्कानो, फ्लोरिटा तुस्कानो, निशिगंधा तुस्कानो, अलिशा तुस्कानो, जिनल तुस्कानो, लॅरिसा तुस्कानो, फेलिसा तुस्कानो, स्नेहल तुस्कानो
गायक :- लिनेट तुस्कानो, रोमाली तुस्कानो, रेक्सिना तुस्कानो, मॅक्सवेल तुस्कानो & विजय मच्याडो
वादक :- स्विटसन फर्नांडिस, वॉल्टर डायस, अनिल डिसोजा, सिऑन आल्मेडा & प्रसाद
दिग्दर्शक :- लेरॉय कोरीया
मरीकाकयसा लव लेटरसध्या बाबुकाका पटनाला गेल्या आणि मनून मरीकाकयन्या त्याला लीवीलेला लेटर

ओह मा डीअर, कडेस मिळे नाय आज काल बॉम्बे बिअर.
ओह मा वाघोलीसो खाजो, तूस माव राजो
ओह मा शोन्या, तडे कून धविते तुआ पोन्या
ओह मा कारभारी, तडे हाय गा हॉटेल भंडारी

ओह मा भेळ, कते काडदा मा करतीन वेळ
ओह मा खोबरा, देवा कते येद्या मा डोकरा….
ओह मा हुक्को नाळ, जाम आयक्याशी जाले तुमश्या तोंडाशी गाळ
ओह मा लवर, मा करतीन तुमे हा जॉनी लिवर


तूमाला का हान्गो, तुम्हे गेल्या पासून मा का हालत जाले ता फक्त त्या शिमालास माहित, दापुडने मिन्गारने, मा खबर घ्यादो येते. तुम्हे गेल्या पासून मा दोपार्शी निजूस गेले, मंग आखो दोपार मे त्या तेर्शी घारा वार्ता करीत बेहाते, तुमे तडे गेल्या मनून माला जीवन मानून बाह्या नाय, रमेदी देवला गेल्ती तड्ने 3 किलो डुकरा मटन हाडलोता, 3 किलो इंद्याल केला पण खपव्यादो माला एकटीला 8 दि लागले. तुम्हाला इंद्याल आवडाते, त्या आठवनिने माला भाहेस नाय तरी मे तहा बाहा खाला. अरेय दापुड्ने अन्द्र्या कोपात पेवोन हालात हालात गेलो गा माला तुम्शी खूप आठवण येते मे विसार करते “बरा जाला गणी, खडला बिहारला गेले, नाय त्या बिगाडलो या घतीन हालात हालात येवतो ” तुम्हाला का हान्गो, तुम्हे तडे पटनाला गेल्या मे अडे सगळ्यांना बँकोक पट्टाया (बिहार, पटना) ला गेले आहा हांगिले, तडे तुम्हे हयान भरत्या, दुध काढत्या मंजे भय (म्हशी) हाम्बालत्या अडे मे तुम्हे तडे मशीन ओपरेटर हा, आहा हन्गात्या, तुम्हे कयुस टेनशन घ्याव नाका, मे बरी हाय, ८-८ दिहाला जावोन डाक्टरशा दरी, BP चेक करते.

तुम्हाला का हान्गो मांगशा वेळेला बाठात कामे होते, तीगाळा माला तुम्शी जाम आठवण जाली, विसार केलो “अक्करमशाव दारू पेते, गाळ्यो देते पण जागा कुड्व्या, बुडे वाळ्या आणि ओळ्यो कर्या. बरो होतो गणाय आणि स्वताई काळजी घ्या आणि जोडीला भयशी पण काळजी घ्या, माई काळजी करो नाका आणि मिने मिने पाणी पण पेत जा, कून तडे बघ्या नाय मनून नुसती दारू नाका पेव, बी काय नाय ना, पण कय जाला ते माला तडे येवे नाय. साला आते खपविते.

तुम्शी......
मरी..........

सचिन रॉड्रिग्ज, रांबाई
इमळाई जत्राइ गोष्ट त्या काळाश्शी हाय जिगाळा सगळा लोक फक्त भाटात आन हिवारात खप्याशे. पोरे दिवाळी रजेमीने मामारा र्यापदो जाशे. मे महिनो मामारा रेवोन घारा जा निंगाले गा मामरशी बय आणि मावश्यो-मामू वगैरे भाश्याला एक-दोन रुपये हातात घाल्याशे. तर मंडळी, एकदा ओहोस एक मामू (मामा) घरशा पोरांना आणि मामारा र्यारदो आलेल्या भाशोन्डांना बैलगाड्यात इमळा (निर्मळश्या) जत्रेत गेलते. पोरायी जाम मज्जा. पाळण्यात बेहले. घोड्योर बेहले. फटफट्याइ सर्कस बगीली. खजूर खालो. हुकेळे खाले. आणि बी मामरश्या बयदो खजूर घेट्लो. कुरमुरे, सन्यायी डाळ आणि त्यामीने हाकरसने. सगळा खावोन जाला. खावोन खावोन पोट भरला, तही मंडळी घारा जादो निगाली.

पोराइ बाजे, ढोल आणि पिपेरयो वाजव्यादो सुरवात केली. गाडा नुसता फुलोन गेलता पोरा हौशेए. पुढे वाघोली फाट्योरने गाडा निंगाला. आन मामा बगीत्ये ते त्यावो लाडको भासो, अन्द्र्या कय बोलेस नाय, गुपचूप बेहले. मामाने विसारला, ‘अन्द्र्या का जाला?’, अन्द्र्या चूप चाप, थोडो वखत जालो. मामाला वाटला याला शेन्डू पावतो तो घेट्लो नाय मनून राग आले हायदे. मामा हान्गाते ‘अन्द्र्या तुला शेंडू मे नाळ्याइ जत्रा आली गा घेवोन देणे आन नायते आपली बामन-पडायीश्शी जत्रा हायीस’ तरी अन्द्र्या कय बोलेस नाय, चूप चापूस. आते मामाला राग आलो. ’आत्ये का पाय तुला ता हान्गीदा? गुपचूप कादो बेहेल्या?’ आते अंद्र्याओ धीर हूटलो. आन जत्रेत खालते ते खजूर, हुकेळे, सने, वटाणे आन राती खालती ती वालायी भाजी या सहित सगळा अन्द्र्याने ओगाळला. आख्खा गाडा त्याये भरला. आन अन्द्र्या आते मामाला हान्गाते ‘कयिस पा नाय’. मामा हान्गाते ‘गाडा ओरयासा होता ते हान्ग्यासा नायआ?’ आन मामाने गाडा पोन्ड्या तळ्यात धव्यादो उतरविला.


वॉल्टर तुस्कानो, मेदोडी, नंदाखाल
ओबायझुजूआ पोरा लगीन जाला आन झुजूने मस्त सोबनारी ओबाय हाडली, ओबाय ओटयोर सडल्या जेमतेम वहरीपन जाला नाय, पन ता कून हांगाते ताहा, जाम सोबती ओबाय बगीली आन घरात एवोन हगीली. झुजूला कय पन बोल्याशी हिम्मत नाय, टुकोन टाकिते बास. घरात पोर मुतीला तरी नाव झुजूआ. घरा मेरेदेरे कुत्रा आजारले हायदे तरी नाव झुजूआ. घरा पुडे बाग केले त्यात कुत्र्या झोमभाट पडोन इये पपयशे माडे मोडले पन नाव झुजूआ. लहासें बोलणे देण्यात नंबर एक. पोर बिचारो सगळा ऐकोन थक्लोतो पन पोराला बोल्याशी हिम्मतूस नोती. पोराने कय बोईला बास गा जीव द्या धावाते बास. झुजूआ हरी आन झुजूआ बायकूआ हरी झगडाते बास. झुजूई ओबाय मंजे नुसती आग. घरात काडीया काम कर्या.शी नाय पन बी कुणे कय नीट काम केला नाय गा बडबड कर्याझशी, एकदी का ते जिवताना ईया दाताखाला खडो आलो, ती पटकन हाउला हान्गाते, देवाने दोन बटाट्या घत डोळे दिल्यातु ते जरा सावळासा खडा काड ना, हाऊ पान झुजूआ हरी रेलेली हाय, ती होडदेआ, हाऊ हान्गाते तुआ पोटोर वालो ते तू का हांगाता, देवाने माला दोन डोळे खडे काडया दिल्यातु? मंग तुला ए वेडे वाकडे बत्तीस दात कादो दिल्यात, फोडगणी दोन शार खडे दाताखाला, ताहा खटला कोटावला आन खोलीत गेला आन निजला. झुजू, झुजूई बायकू, पोर सगळे कंटाळलोते. झुजू तोहो हुशार महानु त्याला एकंदरीत लग्ना दिहास अंदाज आल्तो, कि आपला गाडा फसले, लग्ना दिहा पोरी मायारणे डेव्याशी तीगाला गंभीर वातावरण अहया पाय गणाय, पान अडे कय उलटास सल्लोता, पोरीये बय, बाबा, नातेवाईक जाम खुश जाल्यात, नावळ हाड्या गेल्यात त्या हरी पोरीया घरसे नाश्या लागल्यात. नावळ डेव्ली बास ताव पोरीया बयने ओटयोर फटाक्याई माळ लाविली. पोरियो मामा निरवणी करया आल्तोना ते तो हान्गाते, झुजू व्याई, आते आमे हुटले आन तुमे झुप्ले, तिगालास झुजू ने मनात गाठ मारलोती, ई ओ नाय ई सैतान आला घरात. झुजूने एकदी विसार केलो ई गोष्ट वेयाशा कानोर घाल्याशी. एकदी झुजू वेयाशा घरा त्या पोरीया गराना घिती गेलो. व्याई हान्गाते तुमे जहे मा पोरीया गराना घेती आल्या ना, तोहोस मा बाबा, मा नवरीआ गराना घेती मा हर्याय दरी गेल्तो, पान मा नवरी मीने मंजे पोरीया बयमीने कैस फरक पडलो नाय. मा पोरीत पान कैस फरक पड्यासो नाय. झुजू हान्गाते, व्याई, जीव दयाशो गोष्टी करते तुम्शी पोरी. कय हांगा ना.!! तुमे कय घाबरो नका, ताहा कैस कर्या शी नाय ती.. नरकाशा सैतानाई देवाला हान्गीले, ई सैतान आम्शात नाका, आन सर्गात देवदूताई देवाला हान्गिले, ई सैतान तू अडे हाडे हाय दे ते आमे साल्ले नरकात. तिला कडेस जागा नाय. व्यायाशा या बोलण्याये झुजूआ पोट भरला, झुजू मनातशा मनात बोलाते, या मायला, ई आख्खा घरानास आहा हाय, आन झुजू घरा या निंगालो, रस्त्यात त्याला त्याव मित्र शेंडू भेटलो, शेंडू हान्गाते, अरे झुजू बरा जाला तू अडे भेटलो, अरे मा पोरा लगीन हाय, मे ओबाय हाड्यासो, तुला या लाग्यासा, जाम पेओ, मजा करो. झुजू हान्गाते, शेंडू तुला ओबाय पायदे ना ते मा घरा एक हाय ती फुकट घिती जाय.
-नेल्सन डिमेलो, दोनतलावराबहिन्वारशी रजा अहोन पण हकोटे जरा लवकर जाग आली.. तोंडात दतवणी घालोन मिन्गारा दात सोळीत बेहेलतो.. कडे शिड्यो आन साळून्ख्यो, कुणा मिन्गारश्या आम्ब्योर आम्बो खात बेहलेलो पोपट, कवळो.. सगळे आप्लोस आवाज भोट्टो या नादात गातोते... तोंड धविल्योर दादयने केलेले सावळा पिठाय पोळे नि शासो पेलो घेवोन दापुड्श्या बाल्कावात बेहलतो. आते का कर्याासा.. तोड्यात खांद्योर पावडा, कुदळ आन हातात कोयती घेवोन पेदृकाका दिख्लो. मला बगोन.. पेदृकाका - का रे पोरा लवकर उठलोतो? कामोर जासो गा का? मे हान्गीला - नाय रे काको रजा हाय पण जरा लवकर जाग आले. आते विसर करते गा का कर्याोसा.. पेदृकाका - सल माबरोबर भाटात.. यो विसार पटलो नि मे आन पेदृकाका निंगाले भाटात. पेदृकाकाने हातात्शी कोयती बाजूश्या केळीला मारली नि पावड्याय वाल ओरप्या लागलो. मे त्याला विसारला गा मे का करो? त्याने माला केळीशे हुक्के थाटे नि हुक्का कसरा जमा कर्याय हन्गीला. तहा मे ता जमा कर्याि लागलो.

एका हुरुमापर्यंत पेदृकाकाने अर्दोएक वाल ओर्पिलो. मे पण कुदळ घेवोन जहा जमेदे तहो त्याला मदत कर्यात लागलो... आज पयल्यांदा हातात कुदळ घेत्लेल्या माला काय जमात नोता. माय हाल बगोन पेदृकाका बोय्लो," पोरा ता रेवूंदे, तुला जम्यासा नाय.. तू ता सगळा कसरा पाताळ कर.. ई सगळा सुरु असताना पेदृकाका तोंड कय बंद नोता.. पण तो जा का हांगातोतो ता पटातोता. केळीये थाटे, हुक्क्यो हावळ्यो, गवात, वाल आन अड्सा-तडसा कसरा जमा करोन ता पाताळ करेदो ११ वाजले. काका हांगाते आते सल घारा, जरा निम्ब्राय हुकला ग हान्सा येवोन पेटवो...

पुन्हा हान्शापरा ४ - ४.३० वास्ता आम्हे भाटात गेले राब करेदो.. काकाने खाला बेहोन कांडेपेटी पेटविली आन एका कोपर्या त आग लाविली.. दुह्यााट हातात थाटो घेटलो नि तो पेट्वोन त्याने दुह्या१ त एका बाजूला आग लाविली. मे पण मग थाटो घेवोन कामाला लागलो. पण तुम्हाला का हान्गो.. अहो हेक लागलो ना.. घारा आत्मीने आन आफ्फिस्श्या एसी ह्म्वाय लागलेल्या मा आंगाला.. सुलीओर तापलेल्या शिटापात पोळ्याव पीठ टाकिलो गा कहा होते नेमका तहास मा झाला. दोपारश्या निम्ब्रात तापल्यामुळे १५-२० मिनटात सगळा जळोन खाक.. अख्खा हेत राखाडीये भरलोता. काकाला विसरला राब कदो करत्यात, ते तो बोय्लो, "पोरा आक्खा वहरी पाणी प्येवोन जमीन जाम झाले, ती भुसभुशीत कर्याख करतान आन जमीन भूज्ली गा भाता पिक बरा येते. मंग पुड्सो कामधन्दो बरो होते."

पेदृकाका बोय्लो,"काको राब पण झालो गा आंगा हेक्ना पण झाला. पण मजा आली. आजपासून तू जोडीला मे भाटात येणार." ई ऐकोन काकाला बरा वाटला. तो बोयलो, "पोरा ये आजुबाजुशे झाडे, पाने, फुले आन ये पक्षी खूप काय हंगात्यात आपल्याला. खूप हिक्या हारका हाय, ई भाटात काम-मेहनत केल्यामुळेस तर मे अजून हट्टोकट्टो हाय. पण आत्याशा तुहारक्या पोरांना ई कडे रे समजाते. त्यांना या कय पडला नाय रे. बग एकवेळ सगळा हिरवा गरगरीत आहलेला आपला हिवार आते कहा नुसता जळते बग. तुला एक हान्गो गा -

हात जमिनी, हात बावखले, खपन्याकरता माहणु मात्र नाय
बोंब आम्शी दुह्यालेलई जमीन लुटील्यायी पण भाटातशा कामाला आम्शी सदास नाय

-- एडवर्ड डिसोझा, वाघोलीसूचना:-कादोडी या अंकाव तिहरो अंक नाताळश्या हणादिहा, २५ डिसेंबरला प्रकाशित होणार.
या अंकात तुम्हाला लेख कविता आहा काय साहित्य द्यासा हायदे ते १५ नोव्हेंबरपर्यन्त kadodivasai@gmail.com मेल करा. किंवा संपादक मंडळाला संपर्क करा.

संपर्क / अभिप्राय


आमश्या हरी संपर्क कर्याझकरतान किंवा आपलो या अंकाविषयी अभिप्राय, तुमाला का आवडला, का नाय ता आमाला जरूर कळवा. खालश्या ई-मेल आयडी वर ई-मेल करा
संपादक मंडळ :- kadodivasai@gmail.com


आभार


पयल्या अंकांनंतर फोन करोन , मेल करोन चांगल्यो सूचना-अभिप्राय देणार्या सगळ्या कादोडी बंधु-भगिनींशे आम्ही खूप आभारी हात.यो अंक श्री. रॉबर्ट रुमाव यांशा सौजन्याने
Download PDFMore Articles