वर्ष १९७५ , एक प्रसंग मा बालपनासो !! - माई भोटी बय माला सदा हान्ग्याशी '' पोरा , धान जीव , धाना पुडे बिया कय नाय '' पान लानपणी माला धान डेवेसा नाय , माला लटर फटर खाशी जाम होस , जडे तडे जाम सापारे घ्यासो , कून माला कागुळो हान्ग्यासे ते कून उन्दूर हान्ग्यासे . तीगाळा खादो होतास का ? पान जा हाता लागला ता गोड लागला , तीगाळा परीस्तीती तहीस होती , तीगाल्शा लोकाई ताते विकिले आन बटर घेटले ,कादो ते ओबडे तोंडे खादो, ओडोडा ताता कुणाला पुर्यासा , पान तास ओडोडा ताता ३० पैशाला विकातोता आन त्यास तीस पैश्यात ६ बटर याशे जे सगळ्यांना पुर्याशे , तिगाळा आमशा दोनतळया गावात ताते विकत घ्यादो एक महानु यासो त्याला सगळे तातीकर या नावांन ओळख्यासे , गावशो बायको रस्त्यात डोळे घालोन त्याई वाट बग्याशो ...